शिराळा प्रतिनिधी –
शिराळा तालुक्यातील खोतवाडी- बेरडेवाडी येथील अंगणवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका कांता नामदेव खोत यांना निर्भया असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराने ॲंन्टीकरप्शन कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, जीएसटी विभागाच्या उपायुक्त वैशाली काशिद आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी शिरोली पुलाची येथील निवोदित गायिका माऊली गावडे हिच्या सुरेश गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
डोंगर पठारावर असणाऱ्या खोतवाडी- बेरडेवाडी येथील अंगणवाडी शाळा तालुक्यात कशी आदर्शवत करता येईल यासाठी सतत लोकसहभागातून आपल्या शाळेला सुविधा उपलब्ध करण्यासाठी शिक्षिका कांता खोत या सदैव प्रयत्नशील आहेत.
शाळेचा परिसर सुंदर दिसण्यासाठी झाडे लावून समोर बगीचा निर्माण केला आहे. सर्व भिंती बोलक्या केल्या आहेत. कोरोना काळातही त्यांनी चांगले काम केले आहे. गावातील विविध सामाजिक, धार्मिक उत्सवामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो.
या त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान आला आहे. कांता खोत यांना मिळालेल्या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराबद्दल आवळा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी माजी महापौर निलोफरनिलोफर आचरेकर, कळंबा कारागृहाचे उपअधीक्षक साहेबराव आडे, एसपी नाईनचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, प्रा. मेघा पाटील, निर्भयाच्या सुनिता हनिमनाळे,डॉ. सिमा ईंग्रोळे, संध्या महाजन, बाळासाहेब हादीकर, धनंजय पाटील, संपादक विजय काळे, उपसंपादिका मेघा कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: कांता खोत यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार प्रदान करताना उपअधिक्षक सरदार नाळे, वैशाली काशिद, सागर पाटील, साहेबराव आडे आदी. शेजारी अण्य मान्यवर