प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर ठोस निर्णय होत नसल्याने मराठा आंदोलकांनी मंत्र्यांच्या गाड्या, निवास्थानावर तसेच कार्यालयावर हल्ले करायला सुरुवात केली असल्यामुळें . सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील पोलीस प्रशासन अलर्टवर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती,मंत्री चंद्रकांत पाटील ,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली.
तसेच साताऱ्यातील मंत्री शंभूराजे देसाई, जालन्यातील आ.अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे संभाजीनगर येथील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या निवास्थाना सह अनेक मंत्री आणि नेत्यांच्या निवास्थानाची सुरक्षा वाढवण्यात आला आहे.