दिनांक 30 नोव्हेंबरते 2023 रोजीसायंकाळी चार ते दहा या वेळेत. SP-9 मराठी माध्यम समूह आणि SP-9 मीडिया निर्भया वुमन असोसिएशन यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित काळावर उमटलेल्या सुवर्ण मुद्रा या शीर्षकाखाली देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2023 वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
दरवर्षी एस पी नाईन मराठी आणि SP-9 मीडिया निर्भया वूमन असोसिएशन यांच्या वतीने या पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा हा पुरस्कार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .यावेळी जीएसटी विभागाच्या उपायुक्त श्रीमती वैशाली काशीद यांनी या पुरस्कार वितरण समारंभाचे कौतुक केले.
समाजामध्ये काम करणाऱ्या विविध स्तरातील महिलांना सातत्याने प्रेरणा देण्याचं काम एसपी नाईन मराठी करतोय अशा भावना सुद्धा श्रीमती वैशाली काशीद यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना अँटी करप्शन कोल्हापूरचे उपाध्यक्ष सरदार नाळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा तर दिल्यास पण त्याचबरोबर हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मनोगत सुद्धा व्यक्त केलं.
त्याचबरोबर सर्व कार्यक्रमातील महिलांना त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक सप्ताह बदल माहिती दिली. या राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कारासाठी खास आकर्षण म्हणून मलेशियाचा crown ठरला.हे crown खास मलेशियावरून एस डी आर फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सीमा अनिल इंग्रोळे यांनी आणले होते.
त्यांच्यासोबत अनिल इंग्रोळे हे पण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉक्टर सीमा इंग्रोळे यांनी प्रत्येक नवदुर्गा पुरस्कृतिच्या् डोक्यावरती क्राऊन घालून सन्मान केला.यामुळे प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत होता.
या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरदार नाळे उपाधीक्षक अँटी करप्शन विभाग कोल्हापूर प्रमुख, माननीय साहेबराव आडे कळंबा कारागृह उपअधीक्षक, माननीय निलोफर आजरेकर माझी महापौर, माननीय वैशाली काशीद उप आयुक्त जीएसटी, सी नाईन मराठी माध्यम समूह,मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, माननीय डॉ. सीमा अनिल इंग्रोळे एस डी आर फाउंडेशन, मलेशियाचे उद्योजक अनिल इंगोले एसपी नाईन निर्भया वूमन एस पी नाईन मीडिया निर्भया उमन असोसिएशन मॅनेजिंग डायरेक्टर मेघा पाटील,विजय काळे कार्यकारी संपादक, वृत्तसंपादक वैभव प्रधान, रत्नागिरी उपसंपादक मेघा कुलकर्णी, व्हिडिओ एडिटर तोफिक जमादार, एडमिन एक्झिक्यूटिव्ह प्रियंका शिर्के पाटील, माननीय संध्या गोविंदा महाजन वेदाज क्रिएशन, उद्योजिका जयश्री श्रीकांत पाटील , माननीय धनंजय पाटील साईराज उद्योग समूह मॅनेजिंग डायरेक्टर SP-9 डायरेक्टर, जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंगे, जाहिरात प्रतिनिधी तेजस्विनी पाटील ,ग्राफिक्स डिझायनर सौरभ पाटील, निवेदिका देवयानी गायकवाड, निवेदिका स्नेहल घरपणकर, जाहिरात प्रतिनिधी शिवराज खोत, कॅमेरेमन पन्हाळा तालुका सरदार गायकवाड, युवराज वरुटे कॅमेरामॅन, शाहुवाडी जाहिरात प्रतिनिधी अमर पाटील, कोकरूड प्रतिनिधी प्रतापराव शिंदे, पन्हाळ्याचे प्रतिनिधी किरण मस्कर , निवेदिका सई जाधव,आणि सर्व एसपी नाईन मराठी न्यूज चॅनलची टीम यावेळी उपस्थित होते.