गावातील सर्व मराठा बांधव गावाच्या मध्य ठिकाणी नरहरी मंदिर येथे एकत्र आल्यावर प्रथम लहान मुलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मराठा आरक्षणाचे महत्व याबाबत खंडेराव पाटील, कृष्णात शिखरे, शंकर शर्मा, सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर गावातून कॅण्डल मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात येत होत्या
या कॅन्डल मोर्चात लहान मुला-मुलींपासून तरुण, ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते मोर्चाचा पुन्हा नरहरी मंदिर मद्ये येऊन राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
या मोर्चासाठी कळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रणजीत पाटील व कर्मचारी तसेच गावचे पोलीस पाटील सुरेखा पाटील यांनी बंदोबस्त ठेवला होता मोर्चामध्ये सरपंच अमोल नवलव उपसरपंच सुभाष पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंदीची घोषणा देण्यात आली.
या कार्यक्रमाचे संयोजन सागर रावण कृष्णात शिखरे खंडेराव पाटील सुभाष पाटील आदींनी केले शेवटी आभार कृष्णात शिखरे यांनी मानले.