शिंदे-फडणवीसांनी लवकर निर्णय घेण्याची गरज; प्रकृती बिघडली असताना मनोज जरागें पाटील तिघांचा आधार घेत कसेबसे चालले

0
120

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

जालना: मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे.

उपोषणाच्या ९ व्या दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज त्यांना चालता देखील येत नव्हतं. अशात जसजशी मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत चालली आहे तसंतसं मराठा समाज आक्रमक होत चालला आहे.

मराठा समाजाचं शांततेत सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. आंदोलकांकडून राज्यात बहुतांश ठिकाणी जाळपोळ, दगडफेक, गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

या घटना घडत असताना मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन बिघडत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन आणखीन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे.

उपोषणाच्या ९ व्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडत चालली असून तिघांचा आधार घेत मनोज जरांगे कसे-बसे चालले आहेत. उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक दाखल झालं आहे.

परंतु, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपचार, अन्न, पाणी काहीच घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता मनोज जरांगे यांची प्रकृती अजून बिघडण्याच्या आधी राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here