दीपिकाकडून ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चं  प्रमोशन; कारमध्ये ‘झुमका’ गाण्यावर थिरकली

0
72

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : नुकताच रिलीज झालेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चांगलाच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. लोकांनी या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून धरला आहे. या चित्रपटाबद्दल अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नुकताच रणवीरने दीपिकाचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात दीपिका ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील “झुमका” गाण्यावर डान्स गाण्यावर नाच करताना दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

कारमध्ये केला दीपिकाने केला नाच

व्हिडिओमध्ये रणवीर आणि दीपिका कारच्या आत दिसत आहेत. दरम्यान, दीपिका रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ मधील ‘झुमका’ गाण्याचे हुक-स्टेप करत आहे. सोबतच दीपिका चित्रपटातील रणवीरच्या राॅकी या पात्राची हुबेहुब नक्कल करत आहे. संबंधित व्हिडीओच्या शेवटच्या भागाता दीपिका रणवीरला म्हणते, तुझ्यासारखे कोणीच करू शकत नाही. व्हिडीओ पोस्ट करत रणवीरने खाली लिहिले आहे, तिला चित्रपट खूप आवडला आहे.

Source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here