“खरंतर माझ्यापेक्षाही जास्त..” सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार जिंकल्यानंतर कविता मेढेकरांची पोस्ट ‘ती’ चर्चेत

0
80

झी मराठीवर नुकताच ‘झी मराठी पुरस्कार २०२३’ संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याचे खास फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मालिकांनी बाजी मारली. यात तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेने बाजी मारली.

.या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. लग्नानंतर अक्षरा आणि अधिपतीमध्ये यांच्यातील खुलणार प्रेम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

झी मराठी पुरस्कार २०१३ मध्येही तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेने वर्चस्व गाजवलं. अनेक पुरस्कार यातील कलाकारांनी आपल्या नावावर केलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ म्हणजेच अभिनेत्री कविता मेढेकर यांना या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा हे पुरस्कार पटकावले. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली त्यांची पोस्ट व्हायरल होतेय.

कविता मेढेकर यांनी पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, सर्वोत्कृष्ट खलनायिकेला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा हे दोन्ही पुरस्कार मिळणं ही कीमया फक्त लेखिका मधुगंधा कुलकर्णी हीच करू शकते!!! थँक्यू मधुगंधा!! हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद तर झालाच पण

ह्या फोटोतुन तुमच्या लक्षात आल असेल माझ्या बाजुला ऊभी असलेली शर्मिष्ठा राऊत,आमची निर्माती तिलाही माझ्याइतका किंवा खरतर माझ्यापेक्षाही जास्त आनंद झालाय!! आणि तेवढाच आनंद “तुला शिकवीन चांगलाच धडा” टिममधल्या प्रत्येक मेंबरला झालाय हे मला माहित आहे.

थँक्यू टीम !! थँक्यू चंदु सर ,आमचे दिग्दर्शक I am a Director’s Actor; मी भुवनेश्वरी तुमच्या सहकार्याशिवाय साकारू शकले नसते आणि थँक्यू टीम झी संधी दिल्याबद्दल!!पहात रहा “तुला शिकवीन चांगलाच धडा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here