एस पी नाईन मराठी माध्यम समूहाच्या शिरपेचात एक आणखीन मानाचा तुरा…

0
107

SP-9 मराठी माध्यम समूहाला केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी दिल्या शुभेच्छा…

दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या नागपूर ऑफिसला एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी शुभेच्छा व आशीर्वाद घेतला.एसपी नाईन माध्यम समूहाचे एमडी यांनी करत असलेल्या टीव्ही चॅनल कामाबद्दल सर्व माहिती दिली.


नितीनजी गडकरी यांनी चॅनल बद्दलची सर्व माहिती ऐकून घेऊन चॅनल करत असलेले काम याबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले.ते असे म्हणाले की समाजामध्ये अनेक विषय आहेत ते चॅनलच्या माध्यमातून प्रसारण करू शकता.

अनेक वेगवेगळे विषय आहेत.ते विषय समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करा.मीडिया निर्भया वुमन असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी जे काही आपण काम करत आहात त्या कामासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत असे त्यांनी यावेळी उदगार काढलेत.

त्यांनी भावी वाटचालीसाठी चॅनलला शुभेच्छा दिल्या..त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी ऑफिशियल पत्राद्वारे चॅनल साठी शुभेच्छा पत्र दिले.


यामुळे अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही चॅनलच्या शिरपेचात आणखीन एक मानाचाा तुरा भेटला आहे. यामुळे माध्यम समूहा परिवारा मधील सर्वांचा आनंद द्विगुणित झाला आहे .काम करण्याची आणखीन उमेद,ऊर्जा यामुळे वाढली आहे.

एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी चॅनलच्या वतीने भेट म्हणून राजश्री शाहू छत्रपती जीवनचरित्र हे पुस्तक देऊन त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत एस डी आर फाउंडेशन संस्थापिका डॉ.सीमा इग्रोळे याही यावेळी सोबत होत्या.यावेळी त्यांनीही खास मलेशियावरून मलेशियाचे भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.डॉक्टर सीमा इंग्रोळे या करत असेललेल्या सामाजिक कार्याचे त्यांनी खूप कौतुक केले.आणि त्यांनाही एसडीआर फाउंडेशन करत असलेल्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.बिझनेस निमित्त त्या गेले 37 वर्ष मलेशयामध्ये कार्यरत आहेत परंतु त्यांना आपल्या मातीत येऊन समाज कार्य करायचे आहे.त्यामुळे त्या सामाजिक कार्यात सतत कामात व्यस्त असतात.त्यांचे हे काम पाहून समाजामधून भरभरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here