‘वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका’ वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले

0
68

सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यात आता ऐन दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होऊ शकते. यामुळे मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे.

त्यांनी फेसबुक पोस्ट करत हे लोकांना हे आवाहन केलं आहे.

सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे.दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचदरम्यान प्रदुषणाचा विचार करता न्यायालयाने रात्री फक्त ३ तासांसाठी फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे.

नुकतंच वैभव मांगले यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले,’कळकळीची विनंती…मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करु नका.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here