जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रियांका म्हावळे यांचे सुयश

0
112

SP9/ कोकरूड प्रतापराव शिंदे

ग्रामीण भागात असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात कोकरूड ता. शिराळा येथील प्रियांका प्रदीप म्हावळे यांनी यश संपादन केले आहे.

त्यांनी या क्षेत्रातील प्रथम क्रमांकावर कोर्स पूर्ण करित विविध ठिकाणच्या स्पधेॅत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्षेत्रातील व्यावसायिक माहिती मिळावी या हेतूने ग्रामीण भागातील महिलांसाठी क्लासेस सुरू केले.

यामुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू  महिला व मुलींना स्वतंत्र व्यवसायासाठी  लाभ मिळू लागला. प्रियांका म्हावळे यांची गुणवत्तेमुळे त्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या मोठ्या सेमिनार साठी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जात आहे.

अनेक ठिकाणी त्यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून गौरविण्यात आले आहे. येत्या ५ डिसेंबरला पुणे येथे राॅयल ग्रुपच्या वतीने त्यांना स्टार इंडीया गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील युवतीने अथक प्रयत्नांमुळे एका वेगळ्या क्षेत्रात मिळविले हे यश नक्कीच इतरांना प्रेरणा देणारे आहे. त्यांनी अल्पावधीत मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here