लव जिहादच्या संशयातून कोल्हापुरात तरुणास बेदम चोप; पोलिसांनी घेतले ताब्यात

0
90

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन फिरणा-या मुस्लीम तरुणास लव जिहादच्या संशयातून जमावाने बेदम मारहाण केली. मारहाणीत समीर सुलेमान बिजली (वय २२, रा. किणी, ता. हातकणंगले) हा तरुण जखमी झाला.

हा प्रकार सोमवारी (दि. १३) दुपारी घडला.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समीर बिजली हा तरुण सोमवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीस घेऊन रंकाळ्यावर फिरण्यासाठी आला होता.

अल्पवयीन मुलगी सोबत असल्याने परिसरातील काही तरुणांनी याची माहिती हिंदू एकताच्या पदाधिका-यांना दिली. काही वेळात हिंदू एकताचे दीपक देसाई, वैभव कवडे, आदी, कार्यकर्ते अंबाई टँक येथे पोहोचले. त्यांनी मुस्लिम तरुणाला थांबवून त्याची चौकशी सुरू केली.

मुस्लीम तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीला घेऊन फिरत असल्याने लव जिहादच्या संशयातून त्यांनी समीर बिजली याला बेदम मारहाण केली. या प्रकाराची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी समीर बिजली आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलीलाही तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले.

हिंदू एकताच्या कार्यकर्त्यांनी संशयित समीर बिजली याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे केली. बिजली याला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here