काही खात्यांमध्ये चुकून ८२० कोटी जमा झाले, युको बँकेने ६४९ कोटी केले वसूल; १७१ कोटींचं काय झालं?

0
65

युको बँकेकडून चुकून काही खात्यांमध्ये ८२० कोटी रुपये जमा केल्याची घटना समोर आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती, यापैकी आता बँकेने ७९ टक्के रक्कम वसूल केली आहे. युको बँकेने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, विविध सक्रिय पावले उचलून बँकेने प्राप्तकर्त्यांची खाती गोठवली आहेत.

बँकेने दिलेली माहिती अशी, ८२० कोटी रुपयांपैकी ६४९ कोटी रुपये वसूल झाले आहेत. हे एकूण रकमेच्या सुमारे ७९ टक्के आहे. बँकेने १७१ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम वसूल करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणाची माहिती कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनाही आवश्यक कारवाईसाठी देण्यात आली आहे.

हा तांत्रिक बिघाड मानवी चुकांमुळे झाला की ‘हॅकिंग’चा प्रयत्न झाला हे अजुनही समोर आलेले नाही. IMPS प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे ऑपरेट केले जाते.

बुधवारी युको बँकेच्या ग्राहकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ते ग्राहक तात्काळ पेमेंट सेवेद्वारे व्यवहार करू शकले नाहीत. त्यानंतर बँकेने IMPS द्वारे पेमेंट करण्याची सेवा तात्पुरती बंद केली होती.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर असे म्हटले आहे की, देखभाल क्रियाकलापांमुळे IMPS सेवा उपलब्ध नाही. बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे इतर बँकांमार्फत युको बँकेत पैसे भरले असता पैसे कापले जात असले तरी बँकेत क्रेडिट दिले जात नव्हते.

IMPS म्हणजे तात्काळ पेमेंट सेवा, ज्याद्वारे लोकांना इंटरनेट आणि फोन बँकिंगद्वारे त्वरित पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा मिळते. रिअल टाइम व्यवहारांमुळे, बहुतेक लोक ही पेमेंट सेवा वापरतात. IMPS द्वारे, ग्राहक एका खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त ५ लाख रुपये पाठवू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here