कोल्हापूर : फुलेवाडीतील धाब्याजवळ सोमवारी रात्री पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा निर्दयीपणे खून करण्यात आला होता
या खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाचजणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूरसह उपनगरात गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादातून एकमेकांविरोधात हल्ले प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे याच्याविरोधातही गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नलवडे हा फुलेवाडीतील एका हॉटेलात मद्य प्राशन करून मित्रासमवेत दुचाकीवरून जात होता.
दरम्यान समोरून दोन संशयित दुचाकीवरून येत असल्याचे दिसून आले. त्याने हल्लेखोरांना पाहताच नलवडे याने मित्राच्या दुचाकीवरून उडी टाकली. आपल्यावर हल्ला होणार याची चाहूल लागताच त्याने मित्राला आपली पोरं बोलावून घे, असे सांगून तो फुलेवाडीतील धाब्यालगत असलेल्या रस्त्याने पळून जाऊ लागला.
पाठोपाठ संशयित हल्लेखोरांनीही नलवडे याचा पाठलाग सुरू केला. काही क्षणात शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार केले. वर्मी हल्ल्यामुळे नलवडे जीवाच्या आकांताने वाचवण्यासाठी ओरडू लागला.
त्यामुळे परिसरातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाच्यासमोरच डो संशयितांनी शरीराची अक्षरशःचाळण केली. हा जीवघेणा हल्ला बघून त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेला जमाव तेथून पळून गेला.
हल्ल्यात शरीराची चाळण
तोंडाला मास्क बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ऋषीकेश नलवडे याचा थरारकपणे पाठलाग करून त्याच्यावर तलवार, कोयता, एडक्याने हातावर, डोक्यावर पाठीवर, खांद्यावर एकापाठोपाठ एक असे सोळा खोलवर वार केले. त्यामुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली.