Narendra Modi : Video – लय भारी! मोदींचा अनोखा अंदाज, मुलांसाठी झाले जादूगार, कपाळावर नाणं ठेवलं अन्…

0
56

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. चिमुकल्यांसोबत मोदींनी मजा, मस्ती अन् धमाल केली आहे. लहान मुलांसाठी ते जादूगार देखील झाले. नाण्याची एक भन्नाट जादू दाखवली.

त्यांच्या जादूचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींना चिमुकल्यांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी आहे. ते नेहमीच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तो जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. यामध्ये पंतप्रधान दोन लहान मुलांसोबत मजा करताना दिसत आहेत.

त्यांनी एक नाणं घेतलं आणि मुलांना त्यासंबंधीत एक जादू देखील करून दाखवली. मुलांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here