रविवारचा दिवस होता, उडुपीत राहणारे हसीनाचं कुटुंब घरातच होते. २३ वर्षाची अफनान, २१ वर्षाची अयनाज, १४ वर्षाचा मुलगा असीम त्याचसोबत हसीनाची सासूही तिच्यासोबत घरी होती, हसीनाचा पती दुबईत नोकरी करतो.
रविवारी कुटुंब घरी आराम करत होते, परंतु हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा असेल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.
अफनान ड्राँईंगरुममध्ये होती, तेव्हा अचानक चेहऱ्यावर मास्क लावलेला एकजण घरात घुसला आणि चाकूने तिच्यावर हल्ला केला. अफनानचा आवाज ऐकून इतर सदस्य तिच्याकडे धावत गेले, तेव्हा हल्लेखोराने एकापाठोपाठ एकावर चाकूने वार केले.
सर्वजण मदतीसाठी ओरडू लागले. वृद्ध सासू तिच्या खोलीतून बाहेर आली तर तिच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांना जोवर या सगळ्यांचा जीव जात नाही तोवर त्यांच्यावर हल्ला करत राहिला.
घरातील किंकाळ्या ऐकून शेजारचे लोक जमा झाले, तेव्हा एक मुलगी मदतीसाठी धावली परंतु हल्लेखोराने तिला धमकावले. त्या मुलीने धाडस दाखवत पुढे गेली ते्व्हा हल्लेखोर तिथून घाबरून पळून गेला. काही वेळापूर्वी ज्या घरातून हसण्याचा आवाज येत होता तिथे आता भयाण शांतता पसरली होती.
घरात सगळीकडे रक्ताचे डाग दिसत होते, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ४ जणांच्या हत्येने परिसरात दहशत पसरली. जखमी वृद्ध महिलेला हॉस्पिटलला नेले. हल्लेखोर कोण हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान बनले.
पोलिसांचा तपास सुरू झाला, त्यांनी फोन नंबर तपासले, १५-२० लोकांची चौकशी केली. तपासासाठी ५ पथके बनवली त्यानंतर पोलिसांना एक सुगावा हाती लागला.
या चौघांची हत्या महाराष्ट्रात राहणाऱ्या ३७ वर्षीय प्रविण चौगुलेने केल्याचे समोर आले. प्रविणच्या मनात कुटुंबाबद्दल असलेल्या रागातून त्याने हे कृत्य केले. प्रविणचे लग्न झाले होते, त्याला एक मुलगाही होता.
प्रविण एअरलाईन्समध्ये हसीनाची मोठी मुलगी अफनानसोबत काम करत होता. दोघे एकत्र असायचे, त्यांच्यात मैत्री झाली. प्रविणला अफनान आवडू लागली. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांच्या मैत्रीबाबत प्रविणच्या पत्नीला माहिती लागली.
पती आणि अफनानच्या अफेअरचं कळताच प्रविणच्या पत्नीने अफनानच्या घरात घुसून मारहाण केली. या घटनेनंतर अफनाननं प्रविणसोबत बोलणं बंद केले. अफनानकडे प्रविणचे काही पैसेही होते हे तपासात समोर आले.
जेव्हा अफनाननं प्रविणशी बोलणं बंद केले तेव्हापासून त्याच्या मनात राग होता. पोलीस कस्टडीत प्रविणनं गुन्हा कबूल केला. प्लॅनिंगनुसार तो अफनानला मारून टाकणार होता.
ज्यादिवशी तो अफनानच्या घरी गेला तेव्हा इतरही लोकही मध्ये आले. त्यामुळे पुरावे मिळू नये यासाठी त्याने अफनानसोबत अन्य ३ जणांनाही ठार केले. या हत्याकांडात पोलीस अजून आणखी अँगल शोधत आहे. सध्या प्रविण पोलीस कोठडीत आहे.