वादाला कंटाळून एका महिलेने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

0
73

 शेजारी राहणार्‍याबरोबर सतत होत असलेल्या वादाला कंटाळून एका महिलेने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वादाला कंटाळून एका महिलेने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

कविता संजय श्रीवास्तव (वय ४०, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत त्यांचे पती संजय शामलाल श्रीवास्तव (वय४५, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अरीफ हरुन मुल्ला (वय४२, रा. स्वामी विवेकानंद प्रेरणा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १६ नोव्हेबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव आणि अरीफ मुल्ला हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्या किरकोळ कारणावरुन नेहमी वादावादी होत असत.

त्यांनी यापूर्वी एकमेकांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात ३ ते ४ वेळा तक्रारीही दिल्या होत्या. त्यावरुन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईही केली होती. या सततच्या वादाला कंटाळून कविता यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजगुरु तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here