नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांना कोणत्याच परिचयाची गरज नाही. ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवत असतात. पहिल्याच चित्रपटातून कमालीची प्रसिद्धी मिळूनही खऱ्या आयुष्यात ते अगदीच साधे आहेत हे देखील अनेकांना माहितच असेल.
सध्या ते नाळ २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य केले आहे. जिचा त्यांच्या प्रत्येक कामात मोलाचा वाटा आहे.
नागराज मंजुळे यांच्या पत्नीचं नाव गार्गी कुलकर्णी आहे आणि निर्माती म्हणून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. नुकतेच नागराज यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत गार्गीबद्दल सांगितले.
त्यांची भेट अहमदनगरला झाली होती. तिला वाचनाची आवड असून ती स्वतः कविता लिहिते, असे मंजुळेंनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा पटकथा लिहितो, तेव्हा मी ती कथा दोन-तीन व्यक्तींना ऐकवतो.
त्यांच्या होकार, नकारामुळे किंवा कथेबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मला कॉन्फिडन्स येतो. त्यातील एक व्यक्ती म्हणजे गार्गी. मी तिला सगळ्या पटकथा ऐकवतो. तिची सहित्याची समज चांगली आहे. गार्गी कविता खूप चांगली लिहिते. तिने मोजके लिहिले आहे पण ती खूप चांगलं लिहिते.
गार्गी माझा आरसा आहे…
नागराज पुढे म्हणाले, आता एकत्र जगतोय तर ते आहेच. कुतूब, गार्गी, प्रियांका ही माझी नेहमीची टीम आहे. कुतूब एडिटिंग करतो. माझ्या डोक्यात जेव्हा एखादा चित्रपट करायचे सुरू असते तेव्हा गार्गी कुतूबचं म्हणणे असते की तू हे कर, ते करू नको.
बऱ्याचदा ते डोळे झाकून विश्वास ठेवावे असेच असते. गार्गी प्रोड्युसर असते. त्यामुळे माझे व्यवहार ती सांभाळते. पण मी जे क्रिएटीव्ह करतो त्यात तिचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे, असे म्हणायला हरकत नाही.