Sp9 / कोकरूड प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिराळा तालुक्यातील कोकरूड फाटा येथे तासभर आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे मेनरोडवरील शिराळा- कोकरूड, शेडगेवाडी- कोकरूड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गतवर्षीचा ४०० रुपयांचा दुसरा हप्ता व यंदाची पहीली ३५०० रुपये उचल जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहेत. तरीही ऊस दराची कोंडी फोडलेली नाही.
म्हणून आज जिल्हाभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन झाले. दरम्यान शिराळा तालुक्यातील कोकरूड फाटा येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकतेॅ यांची रस्तावर बसून आपल्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केले.
यावेळी संघटनेचे विजय भोळे, बाबा माने, तानाजी शेळके, जयवंत शेळके, जोतीराव माने, धनाजी शेळके, कृष्णदेव पाटील, सजेॅराव खवरे, सुनील खवरे, जालिंदर पाटील, रघुनाथ खवरे, विजय जाधव, अमित शेळके, अनिल खोत, सुनील खवरे, राम पाटील, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, प्रतिक पाटील, राजु पाटील, सागर पाटील, रामदास पाटील अभिजित पाटील, शिवाजी पाटील, सुनील गुरव आदींसह कोकरूड परिसरातील कार्यकतेॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोकरूड पोलिसाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.