प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री येथील वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दूरगी लढत होत आहे.
आज दि २१ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात आले असून सत्ताधारी पैनेल महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला चिन्ह विमान तर विरोधी पैनल राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला कपबशी हे चिन्ह देण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली .
दरम्यान विविध गटातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ६ अपक्ष उमेदवारांना ही चिन्ह वाटप करण्यात आले असून आता प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ३ डिसेंबर रोजी मतदान होत असून मतमोजणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही पैनलचे प्रत्येकी २५ व अपक्ष उमेदवार ६ असे एकूण ५६ उमेदवार रिंगणात आहेत.
कारखान्याचे चेअरमन के पी पाटील,पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, भुदरगड चे माजी आमदार दिनकराव जाधव, बजरंग देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी तर विरोधी खा संजय मंडलिक आमदार प्रकाश आबीटकर, धनंजय महाडिक, भाजपचे राजे समरजित घाटगे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील , भाजपचे नाथाजी पाटील जनता दलाचे विठ्ठल राव खोराट ,राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी च्या नेतृत्वाखाली उमेदवार रिंगणात उतरले आहेत.अपक्ष उमेदवारांना मिळालेली चिन्ह: अजित बाबुराव पोवार, चिन्ह (शिट्टी). बाबासाहेब मल्हारी पाटील चिन्ह ( शिट्टी) रेखा महेश पाटील चिन्ह (रिक्षा) , दत्तात्रय पांडुरंग गिरी चिन्ह (किटली),चंद्रकांत विष्णू परीट-जाधव चिन्ह (छत्री)