Singham 3 मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, रोहित शेट्टीचं कॉप युनिव्हर्स सज्ज

0
60

रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘सिंघम’ (Singham) आणि ‘सिंघम अगेन’ दोन्ही चित्रपट प्रचंड हिट झाले होते. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत शोभून दिसला.

सिनेमाची कथा, अॅक्शन, अभिनय सगळंच दमदार होतं. आता सिंघमचा तिसरा भागही बनतोय. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. दरम्यान यामधील अजय देवगणचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

‘सिंघम 3’ साठी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सची टीम सज्ज झाली आहे. या कॉप युनिव्हर्समध्ये रणवीर सिंहचा ‘सिंबा’ आणि अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आहे. तसंच यावेळी टायगर श्रॉफही त्यांच्यात सामील होणार आहे.

तर करिना कपूर खानही सिनेमाचा भाग आहे. शिवाय दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’ म्हणून समोर येणार आहे. रोहित शेट्टी स्टाईलमध्य ही तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

यापूर्वी रणवीर सिंह, दीपिका, करिना कपूर आणि अक्षय कुमारचा फर्स्ट लुक समोर आला होता. तर आता ओरिजिनल ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगणचाही लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजयने फर्स्ट लुक शेअर करत लिहिले,’पराक्रमी, ताकदवान, खतरनाक, बळ, सिंघम पुन्हा डरकाळी फोडेल.’

धगधगत्या आगीत अजय देवगणचा सिंहाच्या चेहऱ्यासोबत जोडलेला हा किलर लुक आहे. अजय देवगणने नेहमीच त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता सिंघम 3 ची चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here