थेट पाईपलाईन लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला कोल्हापुरात

0
75

कोल्हापूर : शहराच्या नवीन थेट पाईपलाईनचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ४ डिसेंबर २३ रोजी कोल्हापुरात येत आहेत.

एकीकडे मंगळवारी आमदार सतेज पाटील यांचा थेट पाईपलाईनच्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्वपक्षीय सत्कार झाला असताना आता महायुतीही श्रेयासाठी पुढे सरसावली आहे.

गेली अनेक वर्षे थेट पाईपलाईनची आग्रही मागणी केली जात होती. यामध्ये सतेज पाटील यांनी पुढाकार घेत नियोजन लावले होते. यंदाच्या दिवाळीला थेट पाईपलाईनचे पाणी कोल्हापुरात आल्याने सतेज पाटील गटाने जल्लोष करत या पाण्याचे स्वागत केले होते.

मात्र त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हे कोणा एकट्याचे श्रेय नाही असा सूर लावला होता.

या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधीच लोकार्पण करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी शिंदे,.फडणवीस आणि पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार असून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here