मध्य रेल्वेकडून सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोकलसाठी रविवार वेळापत्रक लागू करण्यात येते. रविवार वेळापत्रकामुळे लोकलच्या शेकडो फेऱ्या रद्द असतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकात रविवार वेळापत्रक लागू करण्याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन
मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी यासह विशेष पर्यटन स्थळ आहे. यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी शहरातील कंपन्या बंद असल्या तरी बाजारपेठा उत्साहात सुरू असतात. त्यामुळे नेहमी गर्दी दिसून येते.
पर्यटकांचीही गर्दी…
सुट्ट्यांच्या दिवशी नोकरदार वर्ग घराबाहेर पडत नाही. मात्र, स्वकियांना भेटायला जाणारे, खरेदी करणारे यांची संख्या जास्त असते. मुंबई पाहायला येणाऱ्या पर्यटकांचीही सुट्ट्यांच्या गर्दीत भर पडते.
यामुळे सुट्ट्यांच्या दिवसात रविवारच्या वेळापत्रकावरून प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे याबाबत विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे गोयल यांनी म्हटले आहे.