बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव

0
62

पिंपरी : वडील आणि नातेवाईकांनी १२ वर्षीय मुलीचा बालविवाह २३ वर्षीय तरुणासोबत केला. लग्नाबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी मुलीच्या भावाला दिली. मात्र भावाने हा विरोध झुगारून त्याच्या वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या विरोधात तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. थेरगाव येथील पवार नगरमध्ये १५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

विजय शंकर जाधव (४८, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ), दोन महिला, केशव अच्युत चव्हाण (२३, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर), अच्युत चव्हाण, केशव चव्हाण याची बहीण, ब्राह्मण आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या २० वर्षीय भावाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची लहान बहीण (१२) हिचा विवाह केशव चव्हाण याच्यासोबत लावून दिला. या लग्नासाठी सर्व आरोपी हजर होते. लग्नाबाबत कोणाला सांगू नको, असे फिर्यादी तरुणाच्या वडिलांनी फिर्यादी तरुणाला धमकावले. फिर्यादी हे घाबरल्याने काही दिवस त्यांनी तक्रार देण्याचे टाळले. नंतर फिर्यादी तरुणाने आईला सोबत घेऊन वाकड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here