प्रतिनिधी सुदर्शन पाटील
बाजार भोगाव ते अनुस्करा हा राज्यमार्ग खड्डेमय झाला होता यातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व खचलेल्या बाजू पट्ट्यांमुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एका आरोग्य सेविकेस आपला प्राण सुद्धा गमवावा लागला होता .
त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत व साईड पट्ट्यांची रुंदीकरण व्हावे अशी मागणी परिसरातून जवळ धरू लागली होती या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून बाजार भोगाव अनुस्क्रूरा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली
आहे त्यामुळे वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या मार्गावरून ऊस वाहतुकीसह अवजड वाहतुकीची नेहमी वर्दळ असते त्यामुळे दुरुस्त
केलेल्या रस्ता कायमस्वरूपी राहणार की पुन्हा बुजवलेल्या खड्ड्यातील खडक निघून तेच खड्डे पुन्हा तर पडणार नाहीत ना अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.