प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: करवीर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ सुनिता केदारी बुवा यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सौ सुनिता केदारी बुवा यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रूपाली विलास पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्राम पंचायत कोथळी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी सरपंच पदासाठी सौ सुनिता केदारी बुवा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सर्कल श्री निवास पाटील यांनी सौ सुनिता केदारी बुवा यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी ग्रामपंचायत कोथळीचे ग्रामसेवकसौ शिवानी रघुनाथ पाटील, सौ मंगल रंगराव पाटील, सौ वैशाली दिलीप पाटील, सौ पद्मजा सागर पाटील,सौ मनिषा सागर टिपूगडे , श्री शरद केरबा पाटील, श्री धीरज यशवंत आमते, श्री मोहन केरबा कांबळे, माजी सरपंच सौ रुपाली विलास पाटील, महिपती शिवा कुंभार, यांच्या सह निवडी कामी श्री केरबा भाऊ पाटील, श्री जयदीप जयवंराव आमते,श्री सुनिल संपतराव आमते, श्री केदारी बळीराम पोवार, श्री आनंदा बाबूराव पाटील, श्री विकास शामराव पाटील, श्री वसंत शंकर पाटील आदींचे सहकार्य लाभले .सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सौ सुनिता केदारी बुवा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच सौ सुनिता केदारी बुवा यांनी दिली आहे.