महाआवास अभियानामध्ये गगनबावडा तालुका राज्यात तृतीय

0
63

घरकुल बांधकामामध्ये गुणवत्ता व गतिमानता येण्यासाठी महाआवास अभियान राबवण्यात येते. या अभियानामध्ये गगनबावडा तालुक्याला सन २०२१ – २२ मध्ये अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री व इतर मान्यवर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


राज्यातील ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना जसे रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना, पारधी आवास योजना राबवल्या जातात.

तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या योजना राबवल्या जातात.


अभियानामध्ये गगनबावडा तालुक्यातील सभापती, उपसभापती सर्व पंचायत समिती सदस्य,कनिष्ठ लेखा अधिकारी,उपअभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य आणि योगदान लाभले. महाआवास अभियानामध्ये २०२० – २१ मध्ये राज्यात गगनबावडा तालुका सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये द्वितीय आला होता. मात्र २०२१-२२ मध्ये त्याची दुसऱ्या स्थानावरून घसरण होऊन तृतीय क्रमांकावर आला आहे

Sp9 साठी गगनबावडाहून उत्तम पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here