प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: म्हाकवे ता. कागल कोल्हापूर येथील सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्या वतीने सर्व राजकीय पक्षीय नेत्यांना मराठा आरक्षण संदर्भात निवेदन देण्यात आली होती
ती त्यांनी स्विकारलीही होती पण जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे बिद्री कारखाना निवडणूक प्रचारासाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी म्हाकवे (ता कागल )येथे प्रचार करण्यासाठी आले
असताना बस स्टँड म्हाकवे येथे काही मराठा समाजातील युवकानी त्यांना निवेदन देण्यासाठी थांबले असताना, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या गाडीचा ताफा पुढे नेला
या घटनेचा यावेळी मराठा समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला होता.
यांची दखल घेत आज २४ नोव्हेंबर रोजी सकाळी मराठा समाज बांधव म्हाकवे येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण साठी बसले होते.
जो पर्यंत पालकमंत्री निवेदन स्वीकारत नाहीत, तो पर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्यासमोरून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यानी घेतला होता.
आज आंदोलकरणाऱ्या पंढरीनाथ पाटील (महाराज), प्रदीप पाटील (भाऊ), शहाजी हावलदार, विकास पाटील, केरबा पाटील, दशरथ कुंभार, रघुनाथ पाटील व इतर मराठा समाज व बहुजन समाज ग्रामस्थाची भेट घेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षण मागणी चे निवेदन स्वीकारले यावेळी मोठ्या संख्येने मराठा बहूजंन बांधव उपस्थित होते.