दिव्या भारती (divya bharti) हे नाव बॉलिवूडच्या इतिहासात कोरलं गेलं आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने जगाचा निरोप घेतला.
परंतु, या कमी जीवनप्रवासातही तिने बॉलिवूडमध्ये तिचं नाव अजरामर केलं.तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकीर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते.
तिच्या निधनानंतर बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र आजपर्यंत दिव्या भारतीच्या निधनाचे कारण समजू शकले नाही.
1992 साली ‘विश्वात्मा’ या सिनेमातून तिने बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘सात समंदर पार मैं…’ या गाण्याने दिव्याला एका रात्रीत स्टार केले. हे गाणे हिट होताच दिव्याला 10 सिनेमे मिळाले.
आपल्या छोट्याशा करिअरमध्ये दिव्याने 12 सिनेमे केलेत आणि एकदिवस अचानक सगळ्यांना धक्का देत या जगातून कायमची निघून गेली.
दिव्या भारतीचे लग्न निर्माता साजिद नाडियावालासोबत झाले होते. त्यांची पहिली भेट कशी झाली होती हे खूपच इंटरेस्टिंग आहे. शोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर दिव्या आणि साजिद यांची पहिली भेट झाली होती.
साजिद आणि गोविंदा खूप चांगले फ्रेंड्स होते. गोविंदाला भेटण्यासाठी साजिद शोला और शबनमच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिव्या आणि साजिदची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झाले.
५ एप्रिल १९९३ रोजी आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींग करून परतली होती. यानंतर ती हैदराबादेत शूटींगसाठी जाणार होती.
आपल्या नव्या फ्लॅटचे डीलही तिले साईन केले होते. पण दिव्याच्या पायाला दुखापत झाल्याने ऐनवेळी तिने हैदराबादेतील शूटींगचा प्लान रद्द केला होता़
पण त्याचदिवशी आपल्या फ्लॅटच्या इंटरेरियर डिझाईनसाठी ती नीता लुल्ला व तिचा पती श्याम लुल्ला यांना भेटली होती. दिव्याच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी तिची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत.