प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : एसटी बँकेतील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राज्यातील १४ संचालकांनी गुरुवारी (दि.२३) सदावर्ते यांनी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला थेट दांडी मारली.
आपले मोबाईल फोनही बंद ठेवले आहेत. त्यामुळे सत्तापालट होती की हे पेल्यातील वादळ ठरते. याबाबत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
सहा महिन्यांपूर्वी एसटी बँकेची निवडणूक झाली. याची चर्चा राज्यभरात झाली होती. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते.
बँकेची सत्ता आणि धुरा हाती आल्यानंतर ॲड. सदावर्ते यांनी कोणताही बँकिंग व्यवस्थापनाचा अनुभव नसताना आपले मेहुण्यास व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्त केले. या कालावधीत बँकिंग व्यवहारावर रिझर्व बँकेने ही काही सूचना केल्या. मात्र त्यांचे पालन न करता उलट मनमानी कारभार केला.
गेली काही महिन्यांपासून कोल्हापुरसह बऱ्याच शाखा मधील व्यवहार ठप्प झाले आहेत. कर्ज, ठेवी व दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कर्मचारीमध्ये नाराजी आहे.
याबद्दल विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी सरकारला कारवाई करण्याची मागणी केली होती. राज्यभरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांमधील नाराजी आणि दिवसेंदिवस वाढणारा संताप याचा विचार करून १९ पैकी १४ संचालकांमध्ये ॲड. सदावर्ते यांच्या कारभाराबद्दल नाराजी होती. त्याचा परिणाम गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिसून आला.
या १४ संचालकांनी बैठकी ला उपस्थित न राहता थेट कोल्हापूरकडे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर विभागाची प्रतिनिधित्व करणारे संचालक संजय घाटगे मोबाईल फोन सुरू आहे, पण स्वीकारत नाहीत. ते ॲड.सदावर्ते यांच्या जवळ असल्याचे बोलले जात आहे.
कोल्हापूर केंद्रस्थानी
बँकेच्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत न उपस्थित राहता यातील १४ संचालकांनी कोल्हापूरला जाण्याचा व तिथेच येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतल्याचेही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे ॲड. सदावर्ते यांनी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला डावली त्याच कार्यकर्त्यांनी या चौदा संचालकांना येथे आणल्याची चर्चाही कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
बँकेच्या निवडणुकीत निवडून येताना ॲड. सदावर्ते यांनी व त्यांच्या पॅनल मधील सहकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार बँकेची कामकाज सुरळीत झाली पाहिजे व दिलेली आश्वासनही त्यांनी पाळली पाहिजेत. बँक वाचली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांच्या हा अस्मितेचा प्रश्न आहे. – उत्तम पाटील, विभागीय सचिव एसटी कामगार संघटना