अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आगामी चित्रपट ‘अॅनिमल’ चा ट्रेलर 23 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या ट्रेलरला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला.
ट्रेलर लॉन्चसोबतच दिल्लीत एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान रणबीर कपूरनेही संदीप यांना विचारले, ‘अॅनिमल आणि स्पिरिट एकत्र येऊ शकतात का? यावर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी उत्तर दिले की, त्यांनी याबाबत विचार केला नाही, पण तसे झाले तर सांगेन’.संदीप रेड्डी वांगा प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या स्पिरिट नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्यामध्ये प्रभास एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, या प्रश्नावर संदीप रेड्डी वांगा म्हणाले, ‘मला त्याची कथा, पटकथा आणि पात्रे विकसित करायला तीन वर्षांहून अधिक काळ लागला. हा एक लांबचा प्रवास आहे.
आमच्याकडे चांगले कलाकार होते. रणबीर कपूरसोबत काम करणे ही खरोखरच मोठी संधी आहे. जेव्हा मला कळले की आम्ही एकत्र काम करणार आहोत, तेव्हा मी खूप उत्साहित झालो’.
रणबीरचा ‘अॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी आहे. तर अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.