प्रतिनिधी : प्रियंका शिर्के- पाटील
कोल्हापुरातील राजर्षि शाहू खासबाग मैदान आणि संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह, या प्राचीन वास्तू आहेत .
या वास्तूंची सध्या दुरावस्था झालीय . शाहू खासबाग कुस्ती मैदानात असणाऱ्या आखाड्यात गवताचं साम्राज्य उभारलय तसच या कुस्ती मैदानाच्या तटबंदीला भेगा पडल्या आहेत .
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदान, या वास्तूंसह इथल्या परिसराच्या नूतनीकरण आणि संवर्धनासाठी महापालिकेनं शासनाकड ९ कोटींचा प्रस्ताव पाठवलाय . याबाबत मुख्यमंत्र्यांकड पाठपुरावा करून, लवकरच हा ९ कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन ही कामं पूर्ण केली जातील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिलीय .
आज महापालिकेच्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांनी या परिसराची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते .
इथलं खराब झालेल छत, बंद पडलेली टॉयलेटसह नाट्यगृहातील साहित्य, यांच्या दुरुस्तीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, लवकरच या कामांची पूर्तता होईल, असं यावेळी महापालिकेच्या आयुक्त के . मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं .
जुलै महिन्यामध्ये या कुस्ती मैदानाची भिंत कोसळून त्याखाली सापडल्यानं, एका महिलेला जीव गमवावा लागला होता .
याबरोबरच इथल केशवराव भोसले नाट्यगृहदेखील भग्नावस्थेकड वाटचाल करत आहे . इथल्या टॉयलेट्स बंद असल्यानं कलाप्रेमींची तसच महिलांची मोठी कुचुंबना होतेय .
ही वास्तू प्राचीन कालीन असल्यानं आतील आणि बाहेरून बाजूला आहे दुरुस्ती करण गरजेच बनलय .
या शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जतन आणि संवर्धन तसच निगा राखण्याकड महापालिका प्रशासनाच दुर्लक्ष झाल्याच स्पष्ट झालय .
या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी खजानीस वैशाली क्षीरसागर ,कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के . मंजुलक्ष्मी यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या केशवराव भोसले नाट्यगृहाची आणि शाहू खासबाग कुस्ती मैदान तसच परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली .
इथली अपुरी राहिलेली सर्व कामं कातडीनं पूर्ण करावीत ,असे आदेश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिले .
शाहू खासबाग मैदानाच्या पडलेल्या भिंतीसाठी नगरोत्थान योजनेतून ५० लाखांच्या निधीची मागणी करण्यात आलीय .
केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदान या सर्व कामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून एकूण ९ कोटींच्या निधीची मागणी शासनाकड केली
असल्याची माहिती, आयुक्त के . मंजुलक्ष्मी यांनी यावेळी दिली . हा निधी लवकरात लवकर मिळवून द्यावा, असं सांगण्यात आलं .
या ९ कोटींच्या निधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकड पाठपुरावा करून, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि केशवराव भोसले नाट्यगृह तसच शाहू खासबाग मैदान यांचं जतन आणि संवर्धनाचं काम लवकरच पूर्ण केल जाईल, अशी ग्वाही यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली
.केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरातील शाहू खासबाग मैदानाची पडलेली भिंत ,बंद पडलेली टॉयलेटस्, कॅन्टीन, दरवाजे, छताच काम, व्यासपीठाच काम, ग्रीन रूम, या कामांची पूर्तता करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याच महापालिकेच्या आयुक्त के .मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना सांगितल
.यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आयुक्त के . मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांनी रंगकर्मींसोबत केशवराव भोसले नाट्यगृह तसच खासबाग मैदान परिसराची पाहणी केली .
यावेळी रंगकर्मींनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या . या सर्वांवर लवकरच तोडगा काढला जाईल अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली .
यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषध्यक्षा सौवैशाली क्षीरसागर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, रंगकर्मी सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, प्रसाद जमदग्नी, मुकुंद सुतार, दिनेश माळी, आनंद काळे, अजय कुरणे, सुनील मुसळे, नाट्य वितरक आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, मकरंद लिंगनूरकर, अजय खाडे यांच्यासह नाट्य आणि चित्रपट कलाकार उपस्थित होते .