वीरांचे योगदान अमूल्य: सविधान मुळे जोडले भारतीय: अनेक मान्यवरांचे प्रतिपादन
कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे 26/11 हल्ल्यातील वीरांना आदरांजली वाहण्यासाठी मार्शल योगा अकॅडमी, गार्गीज डीआयडी फाउंडेशन व पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सावंत म्हणाले, 26/11 हल्ल्यात संरक्षण दलातील वीरांचे धाडस व लढा यामुळे त्यांच्या स्मृती कायम अजरामर राहतील.
यानंतर डॉ. कृष्णदेव गिरीम्हणाले, 26 नोव्हेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता.
त्यामध्ये वीरांचे योगदान अविस्मरणीय आहे. म्हणून, जसे आज आम्ही कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक मध्ये आदरांजली चा कार्यक्रम आयोजित केला. तसाच येणाऱ्या प्रत्येक वर्षी आमच्या पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू.
यानंतर डॉ सुरेश राठोड म्हणाले, आज श्रद्धांजली बरोबर राष्ट्रीय संविधान दिवस, संविधानाचे रक्षण ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. संविधानापूर्वी भारत देश वेगवेगळ्या जातींमध्ये विखुरला गेला होता.
सर्व एकत्रित येण्याचे कारण संविधान आहे.
यानंतर डॉ. म्याडी तामगावकर म्हणाले, शहीद जवानांच्या श्रद्धांजलीचे आयोजन करण्यासाठी डॉक्टर राठोड आणि माझे बोलणे काही वेळापूर्वी झाले. आणि हा कार्यक्रम आम्ही अतिशय कमी वेळामध्ये आयोजित केला.
यावेळी मा.पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील (तात्या), एस पी नाईन मराठी चे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, पोलीस मित्र महाराष्ट्रचे समन्वय डॉ सुशील अग्रवाल, पोलीस मित्र समिती चे सल्लागार डॉ.विजय सादळेकर, ॲड सविता कर्णिक, बाबा चव्हाण, सुनील प्रसाद, पैलवान जोशीलकर, अवधूत पाटील, सविता पाटील, नंदा पाटील, पन्हाळा, राधानगरी, कागल व हातकणंगले तालुक्यातील पोलीस मित्र पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.