कोल्हापूर :  पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लंपास, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

0
55

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर : पाळत ठेवून दुचाकीच्या डिक्कीतील रक्कम लंपास करणा-या चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २४) कागल आणि कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथून सुमारे अडीच लाखांची रोकड आणि मोबाइल लंपास केला.

दोन्ही घटनांमध्ये एकच चोरटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुबोध रत्नाकर कदम (वय ५७, रा. कदम मळा, कागल) हे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बँकेतून पैसे काढून घरी निघाले होते.

वाटेत खाऊ गल्लीत ते चहा पिण्यासाठी थांबले असता, चोरट्यांनी त्यांच्या मोपेडच्या डिक्कीचे लॉक तोडून १५ हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याच घटनेतील चोरट्यांनी दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथे मिलन हॉटेल चौक ते लक्ष्मीपुरी धान्यओळ मार्गावर श्री महालक्ष्मी हॉटेलसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख ३३ हजार रुपयांची रोकड अवघ्या पाच मिनिटांत लंपास केली.

याबाबत अन्वर बादशाह शिरसंगी (वय ५३, रा. आरके नगर, मोरेवाडी) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिरसंगी हे त्यांच्या कंपनीची रक्कम घेऊन दुस-या कार्यालयात निघाले होते. जाताना ते चहा घेण्यासाठी थांबले. हॉटेलबाहेर दुचाकी पार्क करून पाच मिनिटांत परत आल्यानंतर त्यांना डिक्कीतील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here