SP9 / कोकरूड प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवणात तणावमुक्त जीवणासाठी ध्यानसाधना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन शिल्पकार एज्युकेशन सिस्टीमचे संस्थापक सोपान शेडगे यांनी केले.
ते तुरुकवाडी ता. शाहूवाडी येथे दत्तसेवा सहकारी पतपेढीच्या वतीने आयोजित ‘तयारी जिंकण्याची’ या विषयावर कार्यशाळेत बोलत होते. प्रारंभी संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव माईंगडे, संचालक विनय जोशी, मुख्यव्यवस्थापक नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना शेडगे पुढे म्हणाले की, सध्याच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवणात आनंददायी जिवण जगायचे असल्यास नेहमी सकारात्मक विचार करावा.
नेहमी चांगल्या लोकांसोबत रहावे. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम, ध्यानसाधना व सात्विक आहार घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी व्याख्याते सोपान शेडगे, शेडगेवाडीचे सरपंच तानाजी नाटुलकर, पत्रकार प्रतापराव शिंदे, दालमिया शुगरचे बालाजी शिंदे, सागर साठे, रुद्र डान्स ॲकॅडमीचे संस्थापक दिलीप ढेकळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास दत्तसेवा सहकारी पतपेढीचे विभागीय अधिकारी लक्ष्मण पाटील, गोरक्ष माईंगडे, प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार, शाखाअधिकारी अशोक पाटील, जितेंद्र साळवी, सुनील कुंभार ,
मुख्याध्यापक गणेश पाटील, मुख्याध्यापिका लता हारुगडे, उद्योजक ॲड. महेश शेडगे, बाजीराव शेडगे, बाबुराव पाटील आदींसह दत्तसेवा पतपेढीचे सर्व कर्मचारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन क्रांती माजले तर आभार लक्ष्मण पाटील यांनी मानले.