प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : सर्वसामान्य गोरगरिबांसाठी आयोजित महाआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सातशेहुन अधिक रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य कृतीशील शिबिरास लहानांपासून वृद्धांनी आवर्जून उपस्थिती लावून आरोग्य तपासणी करून घेतली.
सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध केल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. शिबिर ज्योतिबा मंदिर साने गुरुजी वसाहत येथे झाले.
युवा सेनेचे लोकसभा मतदारसंघ जिल्हाप्रमुख ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, करवीर तालुकाप्रमुख मोहन खोत, जिल्हा उपप्रमुख रमेश खाडे, प्रतापराव इंगळे, मालोजी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्य प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीयचे प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले. डोळे, हृदयविकार, हाडांचे विकार, कॅन्सर, कान, नाक, घसा, किडनी, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार यासह अनेक आजार तपासण्यात आले.
यासह रक्त तपासणी करण्याबरोबरच मोफत औषधे वाटप करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड यांनी भेट देऊन शिबिराची पाहणी केली.
यावेळी दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे, शिवाजी पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. अमरजा पाटील, सौ. धनश्री देसाई, शहर उपप्रमुख सुरेश माने, प्रदीप पाटील, विनायक जाधव, अंगद कोंढरे, रमेश जाधव, गडहिंग्लज तालुकाप्रमुख निलेश पाटील, चंदगड तालुकाप्रमुख संदीप देवन, महेश कदम, शहर उपप्रमुख नितीन पाटील, अतुल कापटे, आयेशा मकुबाई आदी उपस्थित होते.