कोल्हापुर महानगरपालिकेत सन २०२० पासून प्रशासकीय कामकाज सुरू असून कोल्हापूर शहर व उपनगरातील कचऱ्याचा पश्न गंभीर स्वरूपाचा आहे. आज प्रत्येक प्रभागात पाहिले तर कचऱ्याची समस्या असल्याची दिसून येते. पण महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची उपाययोजना व खबरदारी घेतलेची दिसून येत नाही. त्याचमुळे कोल्हापूरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच आई अंबाचाई चरणी रोज लाखो भाविक व पर्यटक कोल्हापूरात दाखल होत आहेत त्यांना देखील या घाणीचा सामना करावा लागत आहे यामुळे कोल्हापूरची प्रचंड बदनामी होत आहे यात भरीत भर म्हणून की काय भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणांत नागरीकांना सहन कराव लागत आहे. या सर्व प्रकरणाला कारणीभूत हे झोपलेले प्रशासन आहे. महापालिका सेवेत असलेल्या संनिटरी इन्सपेक्टर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाही अंकुश नसलेने अंधाधुंद व मनमानी कारभार सुरू आहे पुरेशी वाहतुक यंत्रणा असून देखील त्याचा योग्य नियोजनाच्या अभावामुळे पुरेसा वापर होत नाही, वर्षा नुवर्षे त्याच खुर्चीला चिकटून बसलेले एम् आय कर्मचारी प्रभागात फक्त आपली मक्तेदारी चालवित आहेत, तसेच कोल्हापूर शहरवासियांकडून कर गोळा करणे व आपला पगार भागविणे या कारणापुरतेच काम सुरू आहे महापालिकेने नागरीकांना मूलभूत सेवा पुरविणे हे आह कर्तव्य आहे या सर्व गंभीर बाबींचे वारंवार सूचना देवूनसुध्दा प्रशासन झोपी गेलेचे सोंग घेत आहे ब नागरीकांना बेठीस धरीत आहे. झोपी गेलेल्या या प्रशासनास जाग आणणेसाठी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्यावतीने दवंडी पिटवून अनोखे आंदोलन करणेत येणार आहे तरी दि.२९.११.२०२३ रोजी सकाळी टिक ११.३० बा. कोल्हापूर महानगरपालिका चौकात मा. प्रशासक, आरोग्य विभागशी निगडीत असलेले सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी व सॅनिटरी इन्स्पेक्टर यांनी सदर बाबींचा खुलासा व लेखी आश्वासन देणेसाठी उपस्थित राहावे,
आंदोलनाचे ठिकाण व वेळ : कोल्हापूर महानगरपालिका चौक दि.२९-११-२०२३ वेळ : सकाळी ११.३०