कोल्हापूर /प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
सुनील जगन्नाथ जाधव, वय 50 वर्षे,पद – कृषी अधिकारी,(वर्ग – 2)हे आरोपी आहेत .सध्या त्यांची नेमणूक जिल्हा अधीक्षक कृषी विभाग,कोल्हापूर कसबा बावडा कार्यरत आहेत .सद्या रा.इंद्रजित कॉलनी, फ्लॅट क्रमांक 405,गंगाधाम अपार्टमेंट,जाधववाडी,
कोल्हापूर येथे राहण्यासाठी आहेत.तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात तरी शेतकऱ्यांना लागणारे खत,बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदार यांना स्व:ताचे दुकान चालू करावयाचे होते त्याकरीता आवश्यक असलेला परवाना(लायसन)मिळण्याकरिता तक्रारदार यांनी वरील कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता सदरचा अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम 10,000 /- रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 9,000 /- रुपयांची लाच मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम 9,000/- ₹ तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सरदार नाळे,पोलीस उप अधीक्षक यांनी आरोपीला रंगेहात पकडले.यांच्यासोबत श्रीमती आसमा मुल्ला, पोलीस निरीक्षक
संजीव बंबरगेकर,श्रेणी पो.उप निरीक्षक,पोहेकॉ/अजय चव्हाण, विकास माने,पोना / सचिन पाटील, सुधीर पाटील,पोहेकॉ विष्णू गुरव हे यावेळी सोबत होते.