महाराष्ट्र बॅटरी एन.सी.सी.चे मलकापूर या ठिकाणी एस. टी. टी. शिबिर संपन्न..

0
61

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

मलकापूर: कोल्हापूर एन.सी.सी. ग्रूप च्या वतीने शिवाजी पदभ्रमंती शिबिर या आंतरराष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत १ महाराष्ट्र बॅटरी एनसीसी युनिट च्या वतीने मलकापूर या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर पदभ्रमंती करून एनसीसी छात्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा अनुभव घेतला.

महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली, केरळ, कर्नाटका ,गोवा या राज्यातून एनसीसी छात्र – छात्रसैनिका व अधिकारी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते.


१ महाराष्ट्र बॅटरीच्या या शिबिराला मेजर जनरल योगेंद्र सिंग,ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांनी भेट दिली.या शिबिराचे आयोजन लेफ्टनंट कर्नल एम मुठांना, सुभेदार मेजर शिवा बालक, ए.आर. पाटील, भवानी सिंग, डी के राव, यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here