चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात ११ महिन्यांत तब्बल ४२ खून

0
72

कोल्हापूर : खुन्नस दिली, दुचाकी आडवी मारली, शिवीगाळ केली, उसने घेतलेेले पैसे दिले नाहीत, गल्लीत दमदाटी केली अशा किरकोळ कारणांवरून एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात..

खून झाले, तर.. खुनाचे प्रयत्न झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा.. खून जास्त झाले आहेत, त्यामुळे क्षुल्लक कारणांवरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे.

११ महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?

खून : गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यात.. खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली. कोल्हापूर शहरासह इचलकरंजीत खुनाच्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. यातील.. गुन्ह्यांची उकल झाली. बहुतांश खून किरकोळ कारणांतून झाले आहेत.

खुनाचा प्रयत्न : जीवघेणा हल्ला करण्याचे .. गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले. या सर्व गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी संशयित हल्लेखोरांवर कारवाया केल्या आहेत. खुनांप्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढत आहेत.

हाणामारीचे ३४० गुन्हे : कौटुंबिक वाद, शेजा-यांसोबत होणारे वाद, गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष, वर्चस्ववाद, किरकोळ कारणांवरून होणा-या मारामारीचे ३४० गुन्हे नोंद झाले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खून, खुनाचे प्रयत्न आणि मारामारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ११ महिन्यांत ५१ खून झाले, तर ५९ खुनाचे प्रयत्न झाले. मारामारीचे ३४६ गुन्हे नोंद झाले.

या घटनांनी शहर हादरले

पाठलाग करून गुंडाचा खून : ऐन दिवाळीत १३ नोव्हेंबरच्या रात्री फुलेवाडी परिसरात सहा जणांनी पाठलाग करून गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे याचा धारदार शस्त्रांनी खून केला. त्याच्यावर तलवार, कोयता आणि एडक्याचे १६ वार केले होते.

डोक्यात दगड घालून वृद्धेचा खून : ऑक्टोबर महिन्यात जवाहरनगर येथे एका तरुणाने डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून केला. मद्यप्राशन करीत असल्याचे घरात सांगितल्याच्या रागातून तो खून झाला होता.

किरकोळ कारण पुरेसे

खून, मारामारी, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांसाठी किरकोळ कारणे पुरेशी ठरत आहेत. टेंबलाईवाडी नाका परिसरातील झोपडपट्टीत केवळ रागाने पाहत असल्याच्या कारणावरून खून झाला होता. फुलेवाडी परिसरातील गुंडांच्या टोळ्यांमधील वर्चस्ववादातून शिवाजी पेठेत पाठलाग करून एकावर जीवघेणा हल्ला झाला. मुक्त सैनिक वसाहत परिसरात पूर्ववैमनस्यातून एका टोळीने दोन तरुणांना पाठलाग करून मारहाण केली. अशा घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here