Sangli: घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले, तरुणाने गळफास घेत जीवन संपवले

0
109

जत तालुक्यातील संख येथील महेश ईरगोंडा जिगजेणी (वय २३) या तरुणाने आपल्या राहते घरी तुळीस दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र सायंकाळी उघडकीस आली.

घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

महेश याने कर्नाटकातील विजयपुर येथे बी.एस.सी. नर्सिंग प्रशिक्षण एक वर्षापूर्वी पुर्ण करुन आपल्या गावी आला होता. सध्या नोकरीसाठी प्रयत्न करत होता. महेश अन् आई दोघेच संख येते राहत होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते समोरच भाड्याने राहत होते. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर महेश नोकरीसाठी बाहेर पडणार होता.

काल, मंगळवारी सकाळी त्याची आई नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने बाहेर गेली होती. सायंकाळी घरी येता दरवाजा उघडला असता महेश यांने गळफास घेत आत्महत्या केली होती.

घटनेची माहिती उमदी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालय पाठवला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद उमदी पोलिसात रात्री उशिरा नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून तो अत्यंत नैराश्यतेमध्ये होता असं नातेवाईकाकडून सांगण्यात आले. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here