प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
संभाजीनगर : येथे आज ३० नोव्हेंबर सकाळी सहाच्या सुमारास आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने संभाजीनगर शहरात ११ ठिकाणी एकाचवेळी या धाडी टाकल्या असल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईत २०० शे पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे.
या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे
छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे.
या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.