शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या व सातारा जिल्हा अध्यक्षा सौ.छायाताई शिंदे यांची मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याला कोल्हापूर करवीर नगरीतून सुरुवात..

0
636

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर: दिनांक 2 डिसेंबर 2023 दुपारी एक वाजता श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याची सुरुवात केली.उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यावतीने नुकतीच उपनेत्याापदी सौ छायाताई शिंदे यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका गेल्या 25 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती केली आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच एवढे मोठे जबाबदारीचे पद छायाताई शिंदे यांना मिळाले आहे.खटाव तालुक्यातील निढळ हे माहेर व कराड तालुक्यातील निगडी हे सासर असलेल्या सौ छायाताई शिंदे यांनी 1997 पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे राहून आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला.या निवडणुकीत पराभवानी खचून न जाता.त्यांनी शिवसेनेचे कार्य सतत जोमाने चालू ठेवले होते.


उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर फार मोठ्या विश्वासाने टाकलेल्या उपनेते पदाची जबाबदारी निश्चितच आपण यशस्वीरित्या पार पाडू.त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू आणि येत्या 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील असे यावेळी त्यांनी सांगितले.
मातोश्री निष्ठा सुसंवाद दौऱ्याला सुरुवात आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्यासाठी सुरुवात केली.यावेळी देवस्थान कमिटी यांच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

या मातोश्री निष्ठा सुसंवाद दौराच्या शुभारंभाला शिवसेना उपनेते व जिल्हाध्यक्ष संजय पवार, शुभांगी पवार,शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महालक्ष्मीची मूर्ती देऊन स्वागत केले तसेच स्मिता मांढरे सावंत उपजिल्हा संघटिका स्मिता मांढरे सावंत यांनी चांदीची महालक्ष्मी मूर्ती देऊन स्वागत व शुभेच्छा दिल्या.यावेळी सुप्रिया पाटील, रीमा देशपांडे ,धनवंती नरके,विकी मोहिते ,महेश पाटील, गोविंद वाघमारे ,विकास बुरभुसे,रुपेश रोडे ,सुमितआणि कोल्हापूर जिल्हा शहर महिला आघाडी शिवसैनिक पदाधिकारी देवस्थान कमिटी त्याचबरोबर महिला पदाधिकारी शिवसैनिक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here