SP9 /कोकरूड प्रतापराव शिंदे
आज समाजात बाल मजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वचिंत राहीली आहेत. बाल मजुरी व बाल गुन्हेगारी याच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र डान्स ॲकॅडमी निर्मित ‘उपोषण’ या बाल लघुचित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी ता. शिराळा येथे करण्यात आला असून या चित्रपटाचे शूटिंग शेडगेवाडी, मोहरे, कोकरूड, खिरवडे फाटा, वसाहत, रुद्र डान्स ॲकॅडमीत झाले आहे.
या बालचित्रपटा जेष्ट अभिनेते अरुण नलावडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते दिपक कदम, प्रसिद्ध अभिनेत्री योगिता भोसले,अभिनेत्री मधुरा गुजर,अभिनेत्री नमिता सिंग अभिनेते ॲड विनोद दोंदे यांच्यासह बालकलाकार म्हणून आराध्या शिंदे, श्रुतिका पाटील , रुद्र ढेकळे, दिक्षा साठे, स्वरा ढेकळे , प्रणाली धनी, जोशना गुरव, जयराज ढेकळे, चंदना झाडे, तेजस्विनी शेळके, जान्हवी पाटील, श्रद्धा सावंत, आरोही पवार हे काम करत आहेत.
या लघु चित्रपटाचे निर्माते दिलीप ढेकळे, कार्यकारी निर्माते दिनेश सावंत ,लेखक राकेश शिर्के, दिग्दर्शन संजय कसबेकर , कॅमेरामन म्हणून धनराज वाघ हे काम करत आहेत.
शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी परिसरात पहिल्यांदाच बाल चित्रपटाचे शूटिंग होत असलेने परिसरातील लहान मुले, नागरिक शुटींग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत.
चौकट: बाल चित्रपटात स्थानिक कलाकार मुलांना संधी
शेडगेवाडी येथे पहील्यांदाच होत असलेल्या उपोषण या बाल चित्रपटात परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील, दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी, सरस्वती विद्या मंदिर शेडगेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे
उपोषण या बाल चित्रपटात आथिॅक विवंचनेमुळे बाल मजुरी च्या कचाट्यात अडकलेल्या उमा या शालेय मुलीला पत्रकारांच्या सतर्कतेमुळे न्याय मिळाला. उमा या मुलीस बातम्यांची दखल घेऊन आमदारांनी शिक्षणासाठी मदत करून पुन्हा तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. चित्रपटात प्रसिद्ध SP9 टीव्ही चॅनल चे पत्रकार म्हणून एसपी नाईन न्यूज च्या प्रतिनिधी योगिता भोसले व कॅमेरामन प्रतापराव शिंदे यांनी काम केले आहे .