कोल्हापूर – मराठी चित्रपटसृष्टीच्या पाऊल खुणा समजल्या जाणारा जयप्रभा स्टुडिओबाबत नवनवे खरे, खोटे दावे समोर येत असतानाच शनिवारी पुण्यामध्ये लक्ष्मी प्रभाकर पेंढारकर (वय ८३) या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सूनबाईंचे वृद्धापकाळाने निधन झाले.
लेखक, चित्रपट दिग्दर्शक व माहितीपट निर्माते म्हणून देशभरात सुपरिचित दिवंगत प्रभाकर पेंढारकर यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्यामागे दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
काही काळ राजकमल कलामंदिर मध्ये व काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत श्रीमती लक्ष्मी यांनी बाल शिवाजी व शाबास सूनबाई या प्रभाकर पेंढारकर यांच्या चित्रपट निर्मितीतही सक्रीय सहभाग दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनदर्शन नावाचा एक स्लाईड शो त्यांनी बनवला होता आणि तो त्या ठिकठिकाणी सादर करत असत. गेली आठ, नऊ वर्षे त्या कंपवाताने आजारी होत्या.