Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! ‘ॲनिमल’ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

0
75

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ॲनिमल’ सिनेमा शुक्रवारी(१ डिसेंबर) प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत.

जिकडेतिकडे सर्वत्र फक्त ‘ॲनिमल’ची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा बिग हिट ठरत आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच ‘ॲनिमल’ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘ॲनिमल’ चित्रपटाची केवळ देशातच नाही तर परदेशातही क्रेझ पाहायला मिळत आहे.

अवघ्या तीन दिवसांत रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या सिनेमाने देशात २०० कोटींचा आकडा पार केला आहे. तर जगभरातही ‘ॲनिमल’ चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल ३५६ कोटींचा गल्ला जमवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here