जनरल प्रॅक्टिशनर्स असोशिएशन च्या ‘गीत बहार प्यार के नगमे’ मैफलीत नृत्यृ – गीत – संगितासह विविध कलांचे बहारदार सादरीकरण

0
95

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर – वैद्यकीय विश्वात नेहमीच ताणतणावत करीत असणाऱ्या जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनच्या विविध सभासद डॉक्टरांनी शाहू स्मारक भावनात गीत, नृत्य, संगीत यांच्यासह विविध कलागुणांचे सादरीकरण करून एक सकारात्मक माहोल निर्माण केला .

‘ गीत बहार प्यार के नगमे ‘ या संकल्पने आधारित हा सोहळ्यात रॅड्रो ते मॉर्डन चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण तसेच नृत्य आणि जादूचे प्रयोग अगदी व्यावसायिक गुणवत्तेच्या दर्जेदारपणे सादर करण्यात आले .

प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष डॉ .राजेश सातपुते यांनी सर्वांचे स्वागत करताना वैद्यकीय विश्वात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या कलागुणांना व्यासपीठ निर्माण होण्यासाठी आगामी काळात असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ.संतोष प्रभू डॉ. राजेंद्र चिंचणीकर डॉ सचिन शिंदे यांनीही आपली शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली . या सुर संगीतमय कार्यक्रमात डॉ . पौर्णिमा ओसवाल डॉ . अनिता सोनवणे, डॉ .शीतल पाटील, डॉ पूजा पाटील, डॉ जिवीता क्षीरसागरसह समूह नृत्य सादर केले. डॉ मुकुंद मोकाशी , डॉ उदय मुधाळे , डॉ स्मिताराणी मोरे , डॉ शिरीष पाटील,डॉ वर्षा पाटील,डॉ दीपक पोवार , डॉ संजय केटकाळे , डॉ विशांत देशमुख, डॉ राजश्री रायबागे , डॉ चंद्रशेखर धनलोभे ,डॉ गिरीष मधाळे ,डॉ अवधूत काकडे आदींनी गीते सादर केली .

डॉ वसंत पाटील यांनी जादूचे प्रयोग दाखविले ,डॉ . संदीप पाटील यांनी जंजीर चित्रपटातील अभिनेता प्राण चे ‘ यारी है ईमान मेरा ‘ ही कव्वाली हुबेहुब वेशभूषा आणि त्यातील बारकाव्यासह सादर करून सर्वांची वाहवा मिळवत कार्यक्रमातील वन्स मोअर मिळवला .

तसेच डॉ . संतोष प्रभु च्या मै शायर तो नही या गाण्याने उपस्थित त्यांचे मने जिंकली . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ .राजेश सातपुते, सेक्रेटरी डॉ हरिष नागरे , डॉ शीतल पाटील ,डॉ राजेश सोनवणे, डॉ विलास महाजन यांच्यासह सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी मराठी चित्रपट निर्माते, लेखक डॉ प्रमोद काळे व चित्रपट समीक्षक डॉ अनमोल कोठाडिया तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले राजीव लिंग्रज व सह प्रयोजक के स्टार हॉस्पिटल चे डॉ.कदम बंधू यांचाही सत्कार भावपूर्ण वातावरणात करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुनिता देसाई डॉपूजा पाटील डॉ स्नेहा जोगदंडे डॉ शितल मगदूम यांनी केले
सभासद डॉक्टरांचे कौटुंबिक सदस्य मित्रपरिवार यांनी या कार्यक्रमाचा तीन तासांहून अधिक काळ मनमुराद आस्वाद घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here