प्रतिनिधी : सागर पाटील
कोल्हापूर:उजगाव येथील प्रियदर्शनी कॉलनीतील ओंकार कुमार हिरेमठ वय 42 यांचे सोमवारी निधन झाले.अचानक हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा काही क्षणात झालेला मृत्यू चटका लावणारा आहे.सर्वांशी आपुलकीने वागणारे ओंकार यांच्या या अचानक जाण्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेऊन परत येताना जिथे राहतात त्या कॉलनीच्या गेटवरच अचानक त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसल्याने ते जागेवरच बसले.त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारी आणि इतरांना आपुलकीने प्रेमाने वागणारे ओंकार त्यांच्या मित्र परिवारामध्ये लोकप्रिय होते.ते विमा सल्लागार म्हणून काम करत असताना लोकांना आरोग्य विमा विषयी जागृती करणे ,विमा काढून देणे, एलआयसीच्या पॉलिसी ची विक्री करणे हा त्यांचा कामाचा भाग होता.वीरशैव अर्बन मल्टीपर्पज निधी बँक या संस्थेचे संचालक होते.कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनसीसी (NCC)मध्ये सुद्धा भाग घेऊन चांगलं उल्लेखनीय काम केले होते.
त्यांच्या पश्चात आई -वडील ,पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या या अचानक जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.