बिद्री कारखान्यावर सत्ता कुणाची.?आज होणार फैसला..

0
91

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी ३ डिसेंबरला मतदान झालं. या निवडणुकीत २५ जागांसाठी ६अपक्षांसह ५६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.१७३ मतदान केंद्रावर५६०९१ इतक्या सभासदांपैकी ४९९४० इतक्या सभासदांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावलाय.आज मंगळवार दि ५ डिसेंबर मुस्कॉन लॉन जवळील सुवर्णभूमी इव्हेंट हॉल मध्ये सकाळी ८ वाजल्यापासून १२० टेबलांवर मतमोजणीला सुरुवात होत आहे. दोन टप्प्यात ही मतमोजणी होणार असून जवळपास ५ लाख मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत. सायंकाळपर्यंत याचे निकाल अपेक्षित आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here