SP9/ कोकरूड प्रतिनिधी
तुरुकवाडी ता. शाहुवाडी येथील दत्तसेवा प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषादिन साजरा केला.
भारतीय सांस्कृतिक ठेवा चिरंतन जतन व्हावा.
या उद्देशाने दत्त सेवा विद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक वर्गातील मुला, मुलांनी भाग घेत मोठा प्रतिसाद दिला.
मुलांनी वेगवेगळ्या परिधान केलेल्या वेषभूषेमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला.. यामध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती, मद्रासी, देव देवता, व प्राणी पक्षांची रॅम्प वॉक माध्यमातुन पारंपारिक वेशभूषेचेसादरीकरण केले.
यावेळी भारतीय संस्कृतीचे महत्त्व याविषयी दत्तसेवा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता हारुगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. बाळासाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी जे. एस. पोतदार , मुख्याध्यापिका लता हारुगडे आदींसह शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.