कल्याण – कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ४ डिसेंबर रोजी विविध विकास कामांचा पाहणी दौरा केला होता. त्यांच्या दौरा पार पडताच काल ५ डिसेंबरपासून कल्याण शीळफाटा ते महापे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
काम सुरु झाल्याने त्याठिकाणी शिवसेना उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह ठाण्यचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी काल रात्री जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
शिळफाटा येथील कल्याण फाटा ते महापे रस्ता ह्या दरम्यान जो उड्डाण पूल होणार आहे. त्यासाठी कल्याण शीळफाटा ते महापे रस्त्यावरील असलेल्या वाहतूकीसाठी पर्याय हवा होता.
त्यासाठी खासदार शिंदे यांनी ह्या टेकडीवरुन जाणाऱ्या दोन पाइप लाइन मधील अरुंद रस्त्याच्या रुंदीकरण करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकारी वर्गास दिल्या.
कामाची निकड लक्षात घेता अधिकारी वर्गाने खासदारांचा दौरा पार पडताच. त्याच रात्रीपासून रस्ता रुंदीकरणास सुरुवात केली. त्याठिकाणी असलेल्या जलवाहिन्या हलविण्याचे काम केले जाणार आहे. याशिवाय या रस्त्याच्या वळणावरच एक नागरी आरोग्य केंद्र होते. ते देखील हटविले जाणार आहे. ते त्याठिकाणी नव्याने उभारले जाणार आहे. हे केंद्र ठाणे महाालिकेच्या हद्दीत होते.
शीळफाटा सर्कलवर उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. शीळफाटा ते महापे या एमआयडीसीच्या रस्ता रुंदीकरणामुळे पर्यायी प्रशस्त रस्ता उपलब्ध होईल. वाहतूक बंद न ठेवता उड्डाणपूलाचे काम करणे यामुळे शक्य होणार आहे.
उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्याकरीता वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक विभागाच्या पोलिस अधिकारी वर्गास खासदार शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शीळ फाटा उड्डाणपूलाची एक लेन १५ जानेवारीपर्यंत खुली करण्या करणे शक्य होईल. एक लेन खुली झाल्यावर हलकी वाहने खालून जातील. तर अवजड वाहने पूलावरुन मार्गस्थ होतील.